सन 1986 मध्ये प्रदर्शित ‘तुझ्यावाचून करमेना’ चित्रपटातील वरील ओळ. खरंतर आज ही ओळ आठवण्याचं कारण म्हणजे, कोरोना महामारीमुळे आज संपूर्ण समाज त्रस्त आहे. सरत्या वर्षाने या महामारीमुळे ज्या कटु आठवणी आपणा सर्वांना दिल्या आहेत, त्याने अनेकांचे डोळे पाणावलेत. त्यामुळे आज या सरत्या वर्षाला निरोप देताना प्रत्येकाची ‘ ईडा पीडा टळू दे, अन् 2020 हे वर्ष लवकर संपू दे’ हिच भावना आहे. पण 2020 ला आपण जरी निरोप दिला, तरी इतिहासात मात्र या वर्षाची नोंद कायमस्वपरुपी राहणार आहे.
कारण, इतिहासात
डोकावलं, तर अशा अनेक महामारींचे दाखले आपल्याला मिळतील. सन 1155 पासून ते अगदी 2017
मध्ये विविध देशांनी आपल्या शत्रू राष्ट्राविरोधात जैविक युद्ध पुकारुन त्या देशांची
अर्थव्यवस्थाच नव्हे, तर सर्व यंत्रणाच कोलमडून टाकली. पण तरीही ते देश नव्या जोमाने
उभे राहिले.
यापैकीच एक
सांगायचं तर, सन 1939 साली जपानने रशियाविरोधात टायफॉईड व्हायरसचा वापर केला. तर 2014-2017
दरम्यान सीरियाने जैविक आणि रासायनिक अस्त्रांचां वापर करुन आखाती देशात हाहाकार माजवला.
या जैविक युद्धांचीच परिणती म्हणून आज संपूर्ण जगात मलेरिया, फाइलेरिया, चेचक, मॅड
काऊ डिसीज, चिकनगुनिया सारखे रोग असित्वात आले.
सन 1346 साली
तर संपूर्ण यूरोप खंडात आलेल्या महामारीने तब्बल 7.5 कोटी ते 20 कोटी नागरिकांचा बळी
घेतला होता. इतिहासात या महामारीची नोंद ‘ब्लॅक डेथ’ म्हणून केली जाते. याशिवाय, सन 1918 मध्ये संपूर्ण जगात
पसरलेल्या स्पॅनिश फ्लूने स्पेन देश रसातळाला नेला. जानेवारी 1918 ते डिसेंबर 1920
या कालखंडात तब्बल 50 कोटी लोक या महामारीमुळे संक्रमित झाले. तर 1.7 ते पाच कोटी
लोक या महामारीने मृत्यूमुखी पडले.
आपल्या भारतात
ही यापूर्वी म्हणजे सन 1892-1940 दरम्यान आलेल्या प्लेगने तब्बल एक कोटी नागरिकांचा
बळी घेतला होता. ऐंशीच्या दशकात तर इतकी गंभीर परिस्थिती होती की, प्रति हजार व्यक्तींमागे
40 नागरीकांचा मृत्यू होत होता. या महामारीच्या अनुषंगाने गोव्यातील सॅन्गुएम तालुक्यातील
एका अध्यायानानुसार, सन 1900-1910 दहा वर्षात या महामारीमुळे 15 गावंच नामशेष झाली.
याच काळात दक्षिण गोव्यातील चार गावंही नामशेष झाली होती.
तेव्हा ही
सर्व परिस्थिती पाहता अजून तरी परिस्थिती नियंत्रणातच म्हणावी लागेल.कारण कोरोनामुळे
आजपर्यंत भारतात 1 लाख 49 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण जगात 18 लाख व्यक्तींचा
कोरोनाने मृत्यू झाला आहे. आता ब्रिटनमध्ये नवीन कोराना व्हायरस मिळाल्याच्या बातम्या
येत आहेत. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा चिंतेच्या गर्तेत आहे. सर्वांना एकच आशा आहे
ती लसीकरणाची. ती कधी येईल हे माहिती नाही.
काही देशांनी
आपापल्या देशात लस निर्माण करुन त्याचे लसीकरण सुरु केले आहे. भारतात ही लस येण्यासंदर्भात
विविध तारखा सांगितल्या जात आहेत. पण त्याची तारीख अद्याप निश्चित नाही. पण तोपर्यंत Prevention is Better than Cure असाच सल्ला सर्वजण देत आहेत. त्यामुळे जुन्या आठवणीत रममाण
होताना;
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ
सारे क्षणभर
जरा विसावू
या वळणावर
या वळणावर...

No comments:
Post a Comment